कांदरपाड्याचा राजा मंडळाला मिळालेले विविध पुरस्कार व सन्मान
लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२४ मध्ये (जोगेश्वरी ते दहिसर विभाग) सर्वोत्कृष्ट मंडळ आयोजन, अनुकरणीय शिस्त व देखण्या कलात्मक गणेशमूर्ती सादरीकरणासाठी प्रथम पारितोषिक प्राप्त.
लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२३ मध्ये समाजाला प्रभावी प्रबोधन करणारा, भव्य आणि अत्यंत कल्पक कलात्मक देखावा सादरीकरणासाठी 'सर्वोत्कृष्ट देखावा' पुरस्कार प्राप्त.
लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धेत देखाव्याच्या उत्कृष्ट संकल्पनेसाठी व प्रबोधनात्मक कथेसाठी श्री. रूपेश नाईक व भावदेवी गणेशोत्सव मंडळाला 'सर्वोत्कृष्ट संहिता लेखन' पारितोषिक.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव, मंडळ परिसर स्वच्छता आणि आदर्श नागरी सुरक्षिततेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीबद्दल द्वितीय पुरस्कार.
मुंबई पोलीस उत्तर प्रादेशिक विभाग आयोजित सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धेत कायदा-सुव्यवस्था, सर्वधर्मीय सलोखा व शिस्तबद्ध गर्दी व्यवस्थापनासाठी प्रथम पारितोषिक.
मुंबई पोलीस उत्तर प्रादेशिक विभाग आयोजित सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धेत कायदा-सुव्यवस्था, सर्वधर्मीय सलोखा व शिस्तबद्ध गर्दी व्यवस्थापनासाठी द्वितीय पारितोषिक.